अंकिलेश - एक प्रेमकथा - 34

  • 4.3k
  • 1.6k

३४ @ अखिलेश असं म्हणतात, चोरी कशी ही करा, तिला वाचा फुटतेच. मग चोर किती ही हुशार का असेना. पण तसा मी चोर नव्हतो. पण प्रेम म्हटले की चोरटेपणा आलाच त्या पाठोपाठ. पहिल्याच दिवशी आपण थोडीच सर्व जगाला सांगत असतो आपली कथा? म्हणजे सविस्तर प्रेमकथा? सर्व काही जगाशी फटकूनच. दुनिया जालीम आहे किंवा तिला ही प्रेमकहाणी पटायची वा पचायची नाही असले काही समज असतात की काय? त्यामुळे काही जवळचे मित्र सोडले तर ही बाब म्हणजे अति गोपनीय! आपण कितीही लपवले तरी ही दुरून जग आपली गंमत बघत असतेच. आपल्या नकळत. किंवा आपणच इतके गुंतलेले असतो की आजूबाजूस बघायला सवड नसते