अंकिलेश - एक प्रेमकथा - 28

  • 4k
  • 1.7k

२८ @ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर आचार्य भास्कराचार्य पंडित. तेव्हा वय वर्षे ८५. माझे गुरू. म्हणजे मी तसा आध्यात्मिक नाही. देव नि देवळांमागे जाणारा नाही. समोर जित्याजागत्या पेशंटपुढे मला इतर काही दिसत नाही. अगदी तरूणपणी, म्हणजे माझ्या वडलांचे आचार्य पंडित हे गुरू होते. वडलांचा कल अशा स्पिरिच्युअल बाबींकडे फार होता. बिचारे यात मश्गुल राहिले नि देशोधडीला लागले असे मला वाटायचे तेव्हापासून. मग मी ते सारेच आयुष्यातून बाद करून टाकले. पण बाबांचे गुरू म्हणून पंडितांबद्दल मला नितांत आदर. कारण एकच, पंडित गुरूजी कधीच त्यांच्या ज्ञानाचा वापर चुकीचा करत नसत. नाहीतर भविष्य कथन म्हणजे एक मानसिक खेळ.. समोरच्याच्या मानसिकतेचा फायदा उठवण्याचा. तुला लोक समजून