अंकिलेश - एक प्रेमकथा - 27

  • 3.9k
  • 1.7k

२७ @ डाॅ.अरूणा गावस्कर शेवटी द टाॅम कॅट वाॅज बेल्ड! म्हणजे सुरेन्द्रच्या डोक्यात ती अखिलेशची माहिती मी घातली! अगदी वेळ साधून. परीक्षेला काही आठवडे होते, त्यात सुरेन्द्र काही गडबड करणार नाही याची खात्री होती. नि परीक्षा होईतोवर बराचसा तो निवळेल.. कमीत कमी पूर्ण विचार तरी करेलच.. मी त्याला ओळखते चांगली. माझा अंदाज चुकायचा नाही! पण त्या आधी त्याने काय काय गोंधळ घालावा? केतन काय हातातून गेला जशी जगातील सारी मुले संपलीत. ही वाॅज सो डिस्टर्बड्. मग तो कुठला तरी डाॅक्टर्स मॅरेज ब्युरो! त्यातून आली चार दोन स्थळं. पण ह्याच्या क्रायटेरियात बसतील तर! खरे तर बरेच झाले नाही फिट बसले ते!