२५ @ अखिलेश उस प्रपोझलकी आवाज बहुत दिनोंतक गुंजती रही कँपस मे! त्या' प्रपोझल नंतर मी काॅलेजातला जणू हीरो झालो. मला अशा प्रसिद्धी झोताची सवय तर नव्हतीच, आवड तर मुळीच नव्हती. आजही नाही. इकडे मुलं दिलका हाल कसा सांगावा याबद्दल डोकेफोड करत असताना मी असे काही रोमँटिक करावे.. काॅलेजातली पोरं वेअर इंप्रेस्ड! दोन चार पोरांनी तर मी कन्सल्टिंग प्रपोझालाॅजिस्ट असल्यासारखे मला नवनवीन पद्धती सुचवण्याबद्दल विचारले! मी त्यांना काय सांगणार होतो? मी त्या दिवशी जे केले.. खरेतर माझ्याकडून त्या दिवशी जे झाले.. ते न ठरवता अगदी स्पर आॅफ द मोमेंट झालेले. अंकिताला त्या दिवशी दिलेले प्राॅमिस.. आणि तिला त्या टेन्शनमधून बाहेर