अंकिलेश - एक प्रेमकथा - 23

  • 4k
  • 2k

२३ @ डाॅ.अरूणा गावस्कर माझी अंकिता घरी आली तेव्हा मी खूप आनंदात होते. मुग्धाचा फोन आला.. अंकिता केव्हा न केव्हा केईएम मध्ये अखिलेशला भेटायला जाणार हा माझा अंदाज खराच होता. मुग्धाला सांगूनच ठेवलेलं तसं. तसा सगळ्यांचा ट्रॅक ठेवणं कठीण पण त्या दिवशी क्रिकेटची मॅच, तिथे अंकिता येण्याची शक्यता आहे म्हणून जास्त लक्ष ठेव म्हटलेलं. आणि मुग्धाला ती ग्राउंडवर पहिल्याच लायनीत सापडली! आणि मॅच नंतर अखिलेशने तिला अंगठी घालून सर्वांसमोर केलेले प्रपोझ! त्याआधी अंकिता किती रडलेली वगैरे वृत्तांत नंतर मला अखिलेशने सांगितलाच.. नंतर म्हणजे.. मुग्धाला सांगून मी अखिलेशला घरी भेटायला बोलावले. सुरेंद्रची काॅन्फरन्स होती, त्यामुळे तो नसल्याने सर्व लायनी क्लियर होत्या!