२१ @ अखिलेश दिल्ली दरबारातून परतलो.. शाही मेजवानीनंतर! रविवार असल्याने बसला गर्दी नव्हती. ते ठीक, पण ट्रॅफिक नसल्याने बसला वेळ ही कमी लागला! अंकिता घरी गेली. मी आपल्या घरी. येत्या आठवड्यात सेकंड सर्जिकल टर्म सुरू होतेय. मी सर्जिकल दास तोंडपाठ करून ठेवलेय. आता एक एक चाप्टर करत लव्ह अँड बेलीचे सर्जरी टेक्स्टबुक संपवायला हवे.. इतके जाडजूड पुस्तक. त्यात मध्ये मध्ये छोट्या अक्षरात काही महत्वाची माहिती.. इतके सारे वाचावे नि लक्षात कसे ठेवावे? आज लक्षात येते ते हेच, वाॅर्डात प्रत्यक्ष पेशंट बघत काम केल्याशिवाय मेडिसिन आणि सर्जरी शिकताच येत नाही. पुस्तके वाचून डाॅक्टर बनता येत नाही पण पुस्तके वाचल्याशिवाय ही बनता