अंकिलेश - एक प्रेमकथा - 19

  • 4.1k
  • 1.9k

१९ @ अखिलेश सेकंड इयरचा रिझल्ट! अपेक्षेप्रमाणे अंकिताला चारही विषयात डिस्टिंक्शन. मला तिची तयारी नि हुशारी जवळून ठाऊक होती. पण परीक्षेचा खरा अजून एक फायदा होता, आम्हा दोघांनाही एकच सेंटर आलेले, विल्सन काॅलेज, चौपाटीवरले. त्यामुळे चार दिवस लागोपाठ एक्झाम सेंटरवर ती भेटत होती. काही नाही तर ती दिसली, निघताना जुजबी बोलणे झाले की बरे वाटायचे. शेवटच्या दिवशी समुद्रावरचा गार वारा खात गिरगाव चौपाटीवर भटकणे झाले. तिची तयारी पाहून तिला चारही विषयांत डिस्टिंक्शन मिळणार हे मला तेव्हाच लक्षात आलेलं. अख्ख्या मुंबई युनिव्हर्सिटीत असे एकूण चार पाचच जण. त्यामुळे हिच्या डिस्टिंक्शन्सचे बिल 'बडे बाप की इकलौती बेटी' वर फाडले जाणार हे माहितीच