अंकिलेश - एक प्रेमकथा - 18

  • 4.6k
  • 2k

१८ @ डाॅ.अरूणा गावस्कर अखिलेश साळवी! आमच्या भावी जावयाचे नाव. डाॅ.अखिलेश साळवी खरं तर. ॲस्पायरिंग सर्जन तेव्हा. आता सुपरस्पेशालिस्ट युरोसर्जन. खरं सांगते, म्हणजे आता हे सांगायला आॅकवर्ड वाटते पण शेवटी मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. आणि त्यासाठी मला पहिल्यांदाच सुरेंद्रशी भांडावे लागणार होते. मुग्धाने सांगितलेले अखिलेशबद्दल ते ऐकूनही थोडे मन धास्तावत होतेच. काही असो झाले ते असे झाले हे खरे. एका आईच्या मनाची घालमेल ध्यानी घेतली तर कदाचित यात काही चुकीचे वाटायचे नाही. पण आज विचार करताना वाटते, अंकिताने दुसरा कोणी, म्हणजे श्रीमंतांच्या घरचा, मुलगा निवडला असता तर मी हे असे केले असते? कदाचित नाही. अगदी मनापासून वाटते ते हेच. म्हणजे