अंकिलेश - एक प्रेमकथा - 17

  • 4.3k
  • 1.9k

१७ @ अखिलेश एकूण माझी लक्षणं काही फार चांगली नव्हती. म्हणजे माझी ती दोन्ही मने हल्ली वारंवार बाहेर येऊन मारामारी करायला लागलेली. एकाला अंकिताचा मोह आवरेना. दुसऱ्याला पहिल्यास पटवून देणे जमेना. तरीही शनिवार संध्याकाळी वाटे अंकिताला फोन करावा नि सांगावे, उद्या सकाळी येत नाही म्हणून. पण शेवटी पहिले मन जिंके. नि दर रविवारी सायकल आपोआप ग्राउंडकडे वळे. अरविंदाची सायकल बिचारी कामी येई बहुतेकदा. पण कधी शक्य नसल्यास एका दुसऱ्या मित्राकडून सायकल मिळेच. हुशार नि निरीक्षण शक्ती तीक्ष्ण असणाऱ्या अंकिताच्या निरीक्षणातून ही गोष्ट सुटतेय कसली? मला आठवतं, आमच्या डिस्कशन्स मध्ये पेशंट एक्झामिनेशनबद्दल आम्ही बोलायचो. त्यात इन्स्पेक्शन म्हणजे बाह्य निरीक्षण खूप महत्वाचे.