अंकिलेश - एक प्रेमकथा - 15

  • 5.2k
  • 2k

१५ @ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर टू टेल यू.. अस्थाना येऊन गेले नि माझी एक चिंता मिटलेली. केतन इज अ व्हेरी स्टुडियस बाॅय. हुशार आणि अँबिशियस, ॲस्पायरिंग. आणि परफेक्टली फिट फाॅर माय गर्ल. अबोव्ह धिस, मुळात श्रीमंत! माय प्रिन्सेस विल आॅटोमॅटिकली रूल द अस्थाना'स किंग्डम! किंग्डम म्हणजे एखाद्या उद्योगपतीचे वगैरे असते तसे नाही. डाॅ.अस्थाना इज अ सीनियर अँड रिस्पेक्टेड डाॅक्टर विथ अ रोअरिंग प्रॅक्टिस. सो दे हॅव देअर ओन सेट अप अँड आॅल. अंकिताला हे सर्व मिळेलच. अँड माय प्रिन्सेस इज बाॅर्न टू रूल! अस्थाना लोकं येऊन गेले.. अस्थाना इज अ थरो जंटलमॅन. केतनची आई लवकरच गेली. अस्थानांनी एकट्याने सारे सांभाळून घेतलेले.