अंकिलेश - एक प्रेमकथा - 13

  • 4.7k
  • 2k

१३ @ डाॅ.अरूणा गावस्कर त्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये बसलेले. खूप दिवसांनी मुग्धाचा फोन आला. मुग्धा नि मी फास्ट फ्रेंड्स. जुळ्या बहिणी जणू. आम्ही दोघींनी फार्म्याकाॅलाॅजी पोस्ट ग्रॅज्युएशन एकाच वेळी केलं. दोघीही नायर हाॅस्पिटलात लेक्चरर म्हणून लागलो. माझी सुरेन्द्रशी गाठ पडली, तिची नरेन्द्र देशपांडेशी! गंमत म्हणजे सुरेन्द्र नि नरेन्द्र दोघे मामे भाऊ! इथवर आमचे आयुष्य समांतर म्हणावे असे चाललेले. मग मुग्धा केईएमला शिफ्ट झाली ए.पी. म्हणून. मी राहिले नायर हाॅस्पिटलला. सुरेन्द्रच्या भावाची बायको म्हणून वहिनी, नणंद वगैरे काही म्हणण्यापेक्षा मी मुग्धाला मैत्रीणच जास्त मानते. माझे निरीक्षण असेय ना, की मैत्रीत जनरली आपण एक दुसऱ्याला स्पेस जास्त देतो. नातेसंबंध आले की अपेक्षा