अंकिलेश - एक प्रेमकथा - 7

  • 5k
  • 2.3k

७ @ अखिलेश अंकिता तशी वेडी आहे. वेडी म्हणजे एखादी गोष्ट हवी असेल तर ती प्रयत्न काही केल्या सोडत नाही. त्या गोष्टीचे वेड लागते तिला. त्यावेळी तिला माझे वेड लागले असावे. पुस्तक विकत घेण्याची सबब ही किती लंगडी आहे हे तिला दिसत नव्हते का? बुक स्टोअर काॅलेजच्या आत नाही हे तिला माहिती नव्हते का? आणि एका पुस्तकासाठी तिने मला शोधत यावे हे किती अतार्किक आहे हे तिला समजले नसेल का? पण 'वेडात निघाले वीर मराठे सात' सारखी ती एका वेडात निघालेली. मग त्यासाठी ती काहीही करेल.. वीर दौडले असतील घोड्यांवरून तर ही बी ई एस टी च्या बस मधून! पुढे