त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे थोडा विचार करून कावेरी तिथल्याच त्या खड्ड्यातल्याच काही वस्तू शोधून घेते तिला वाटल कधी कोणत्या गोष्टींची गरज लागेल सांगता येत नाही म्हणून जे हाती येईल ते सगळ घेते व नंतर त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे सरळ पुढच्या दिशेने जावू लागते.. त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे तिला पुढे चालत गेल्यावर खरच त्या भिंतीच्या पलिकडे पाण्याचा आवाज ऐकू येतो. तिला मनोमन खूप आनंद होतो कारण तिथूनच तिला पुढचा मार्ग मिळणार असतो पण तितकच भयाचे भाव पण दाटून येतात. कारण तिथे सगळ्याच गोष्टींपासून धोका असतो.. काही वेळ जावाव कि नको अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते तरीसुद्धा आपल्या मित्रांसाठी आपल्याला गेलच पाहिजे तसही इत राहिलो