रात्र खेळीते खेळ - भाग 14

  • 7.4k
  • 3.1k

ए अनू तु तु इथे कशी पोहोचलीस... नाही तु पण कोणीतरी दुसरीच आहेस मगाचपासूनच सगळ्यांच्या आवाजाने दुसरच कोणीतरी बोलत आहे तु तु पण अनू नसणारच आमची नक्कीच त्या माणसाने तुझ रूप घेऊन कोणाला तरी पाठवल असणार........ वीर म्हणाला.... अरे गप्प शांत हो नाहीतर आपला आवाज त्यांना ऐकू जाईल.... अनूश्री वीरला समजवू लागली.....नाही खोट आहे हे सध्या तर विश्वासच बसत नाही आहे माझा..... वीर म्हणाला.....तेरी मेरी दोस्ती...... अस म्हणत अनूश्रीने वीरच्या तोंडावर हात ठेवला..... व म्हणाली.... शांत हो हे वाक्य पूर्ण नको करू आताच आपल्याला सगळ्यांनाच आधी एकत्र याव लागेल.... जर हे वाक्य त्यांना ऐकू गेल तर एकमेकांना ओळखण नंतर अजूनच