उग्र नरसिंह मंदिर बघून आम्ही आता अशा मंदिराकडे निघालो की ज्याच वर्णन करताना शब्दही अपुरे पडतील.हे मंदिर फक्त हंपीची शान नसून संपूर्ण भारत देशाचे भूषण म्हणावे लागेल.हंपी, विठ्ठलपूरा येथील सुप्रसिध्द "विठ्ठल मंदिर"!!रिक्षाने विठ्ठलपूरा परिसरात पोहचल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिरापाशी जाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर चालत जावे लागते..ज्यांना पायी चालण्याचा कंटाळा येतो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरी कार उपलब्ध आहे.. पण सुट्टीच्या दिवशी त्यासाठी बरीच मोठी रांग असते.मला वाटतं, हळू हळू पायी चालत मुख्य मंदिर येईपर्यंत लागणारे बाजारपेठेंचे अवशेष, एक दोन छोटी मंदिरे आणि उजव्या हाताला असलेली अतिशय सुंदर अशी पुष्करणी हे बघत बघत जाणं जास्त उत्तम..यावेळी पाऊस चांगला झाल्याने पुष्करणी पाण्याने भरलेली