आरोपी - प्रकरण १३

  • 7.6k
  • 4.4k

प्रकरण १३ अंधार पडून बऱ्यापैकी वेळ झाल्यावर पाणिनी आणि कनक ओजस ने गाडी मधुराच्या घरापासून जरा दूर उभी केली आणि चालत चालत घराच्या दिशेने निघाले. “ तर मग कनक, आपण आता मनात काहीही किंतू ण आणता दारा समोर जायचंय, किल्ली लाऊन कुलूप उघडायचं, आत हॉल मधे गेल्यावर उजव्या बाजूच्या जिन्याने सरळ वरच्या मजल्यावर जायचं.वर गेल्यावर उजव्या बाजूला क्षिती ची खोली रस्त्याच्या बाजूला आहे.तिथे जाऊन दीर्घ काळ वाट बघत बसायचं.या गोष्टीची मानसिक तयारी ठेवायची ! ” “ फार वेळ वाट बघायला लागेल आपल्याला असं मला वाटत नाही.”-कनक ओजस म्हणाला. “ कारण मला मिळालेल्या माहिती नुसार, सालढाणा ने ग्रीष्म चे क्रिकेट किट