ऋतू बदलत जाती... - भाग..12

  • 5.4k
  • 3k

ऋतू बदलत जाती....१२. "आजीने फोन स्पीकर वर टाकला होता त्यामुळे महेशिला हे ऐकू गेले. अनिकेत काय बोलला होता ते . तिलाही हायसं वाटलं..संध्याकाळी परत तिला त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचं होतं. जेणेकरून तो संध्याकाळीही पोटभर जेवेल.. तिला आठवलं एकदा तो म्हटला होता मेथीची डाळ घातलेली कोरडी भाजी त्याला खूप आवडते, थोडीशी गुळचट चवीची मात्र.. त्याची आई बनवायची तशी. पण आई गेल्यावर त्याने ती भाजी खालीच नव्हती .कारण तसं कुणी बनवायच नाही. मग त्याने ती भाजी खाणंच सोडलं. आज तीच भाजी बनवायची तिने मनाशी पक्के ठरवले. आता पुढे.... अनिकेत ऑफिसमधून घरी येत होता ,रस्त्यात बार लागतो तिथे त्याने जरावेळ गाडी थांबवली, पण