पासपोर्ट - भाग १

  • 7.9k
  • 3.5k

पास पोर्ट भाग १ वसंत राव नुकतेच निवृत्त झाले होते. फंडांची  रक्कम अकाऊंट मध्ये जमा झाली होती. भरगच्च पेंशन दर महिन्याला मिळणार होती. म्हणजे तशी आर्थिक सुबत्ता होती. एका financial expert शी  बोलून त्यांच्या सल्याने त्यांनी फंडातली बरीचशी रक्कम कुठे कुठे गुंतवली होती. अशी सगळी व्यवस्था झाल्यावर, त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता बाई, एक दिवस रात्री जेवण झाल्यावर वसंत रावांना म्हणाल्या – अहो, मी काय म्हणते, अग म्हणल्यावरच कळेल न, आधीच कसं कळणार ? . आणि असं म्हणून जोरात हसले. त्यांच्या मते त्यांनी मोठाच विनोद केला होता. पण सुनीता बाईंना तसं वाटलं नाही. अहो, काय हे, प्रत्येक  गोष्ट कशी हसण्या वारी