आरोपी - प्रकरण १२

  • 7.6k
  • 1
  • 4k

दुपारी चार ला पाच मिनिटे असतानाच पाणिनी ने क्रिकेट क्लब च्या मैदानात प्रवेश केला. मुद्दामच तो उभा राहून मैदान न्याहाळत उभा राहिला. जणू काही अनेक वर्षांनंतर तो तिथे आला होता आणि आपल्या आठवणीना उजाळा देत आपल्या डोळ्यात ते वातावरण साठवत होता. हळू हळू चालत तो क्लब च्या ऑफिस च्या दिशेने निघाला. पायऱ्या चढून तो वर आला आणि थोडा घुटमळला. त्याला बघून एक माणूस बाहेर आला. “ यस ? कोण हवय? ” “ मी पटवर्धन. मी फोन वर इथल्या सिनियर कोच शी बोललो होतो.” पाणिनी म्हणाला. “ कशा बद्दल?” “ आम्हाला क्रिकेट खेळायचंय, मैदान बुक करायचं होत.” पाणिनी म्हणाला. “ सालढाणा