स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 3

  • 11.8k
  • 1
  • 7.8k

घरी आल्यावर त्याने तिला तिच्या खोलीत आणून झोपवलं आणि तिला पांघरूण देऊन सर्व बाजूंनी उश्या लावल्या... तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत त्याने लाईट बंद केला आणि दार लावून त्याच्या रूमकडे निघाला. थकून-भागून रूममध्ये आला शर्ट काढला फ्रेश व्हायला गेला ते झाल्यानंतर हातात सिगारेट पेटवून खिडकीच्या बाहेर पहात उभा राहिला..... आणि पाच वर्षांपूर्वीच्या विचारात मग्न झाला.... किती काय बदलून गेलं होत... वेळ तर निघूनच गेली होती पण........ ती सुद्धा बदलून गेली होती ती अजूनही समुद्राकडे एकटक पाहत होती....आतातर अंधार होत आला होता....तिच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबल नव्हत....तिच्या फोनच्या आवाजाने ती भानवर आली.... तिने गालावरचे अश्रू पुसत बॅगेतून फोन काढला..... तिने तिच्या