हरि - पाठ ७

  • 4.5k
  • 1.9k

हरिपाठ६ २१ ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि एक पुरता घटु जाणा ॥ १॥ नामचेनि बळे कळिकाळ आपणा । ब्रह्मांडा येसणा तोचि होय ॥ २॥ न पाहे तयाकडे काळ अवचिता । नामाची सरिता जया मुखीं ॥ ३॥ निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामे । नित्य परब्रह्म त्याचे घरीं ॥ ४॥ २२ नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १॥ रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे । दहन पापाचें एका नामें ॥ २॥ ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥ ३॥ निवृत्ति अव्यक्‍त रामनाम जपे । नित्यता पैं सोपें रामनाम ॥ ४॥ २३ अखंड