ऋतू बदलत जाती.......२. खूप सुखी होती ती ...,ति, तिची सावी आणि अनि सर्व काही क्षणार्धात बदलले.. आता पुढे... परत थकून ती आजीच्या रुममध्ये आली.. "आजी.. आजी उठा माझ्या सावीला घ्या ...आजी" तिने तिचं डोकं त्यांच्या मांडीवर ठेवलं, तिकडे सावी अजूनही रडत होती.. आजीला काय झालं कुणास ठाऊक त्या उठल्या, टेबलावरचे त्यांचे ऐकण्याचा मशिन कानात घातले.. आणि.. त्या गेल्या.. सावीच्या रूम कडे गेल्या.. कदाचित.. तिचा आवाज त्यांच्या कानापर्यंत तर नाही पण मनापर्यंत नक्कीच पोहोचला असेल.. त्यांनी दरवाजा ठोठावला, अजून ठोठावला आता त्यांनाही आतून सावीच्या रडण्याचा आवाज येत होता. "सुवर्णा ..सुवर्णाऽऽ.. लवकर दार उघड.."आजी आजीचा आवाज ऐकून आतली ती मुलगी लगबगीने पळतच