भाग ६. राजवीरने महालक्ष्मीला बाहेर तर आणले होते. पण महालक्ष्मी गाडीत देखील थोडीशी घाबरून आसपास पाहत बसलेली होती. आपल्या साडीचा पदर ती अंगावर टाकून अंग झाकून घेण्याचा प्रयत्न करत होती. राजवीरची नजर ड्राइव्ह करता करता तिच्यावर पडली की, त्याला देखील कसतरी होत असायचं.आधी तर महालक्ष्मी अस कधीच करत नसायची. पण या घटनेनंतर मात्र ती खूप घाबरून राहायला लागली होती. "आय स्वेअर महालक्ष्मी, तुझ्यावर असा प्रसंग आणणाऱ्या लोकांना मी अजिबात सोडणार नाही. कोर्टला तर त्यांना नंतर पोहचवणार. पण त्या आधी मात्र त्यांना चांगली शिक्षा देणार!!"राजवीर मनातच म्हणाला. खूप वेळाने त्याची गाडी एका सुनसान रस्त्यावर थांबते. तसा तो महालक्ष्मीला पाहून गाडीचा दरवाजा