ऋतू बदलत जाती... - भाग..1

  • 14.3k
  • 1
  • 7.8k

ऋतू बदलत जाती........१ एका सुंदर प्रभाती तो एक महागडी स्पोर्टस् कार घेवून निघालेल ..रस्ता तसा घाटातला नसला तरी फारच वळणदार ,शांत, चकचकीत पण किंचित धुक्याने वेढलेला होता ,त्याची गाडीही म्हणून संथ गतीनेच पुढे चालत होती..दुतर्फा गुलमोहर आणि बकुळीने बहरलेला तो रस्ता कधीच संपूच नये असेच वाटत होते त्याला...आणि का नाही वाटणार शहराच्या धकधकीतुन आज तो अशा शांत,निसर्ग सौंदर्याने नटलेल्या..ठिकाणी आला होता...पक्ष्यांची चिवचिवाट आणि मातीचा मृदगंध बर्‍याच दिवसांनी अनुभवत होता तो..,त्याने कारच्या सगळ्या खिडक्या उघडून दिल्या गाडीचं वरच छतही उघड केलं..स्टेअरींग व्हिल वरचे दोन्ही हात वर आकाशाकडे उंचाऊन एक दिर्घ श्वास घेतला..जणू असं केल्याने तोही त्या ब्रम्ह देवाने सजवलेल्या निसर्ग देवतेच्या