आरोपी - प्रकरण ११

  • 8.1k
  • 4.6k

प्रकरण ११ दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पाणिनी च्या ऑफिस मध्ये ,पाणिनी, सौम्या, कनक कॉफी पीत बसले होते. “ कनक तुझ्या माणसांकडून काय समजलं? त्या सारिकाच्या घरात कोणी आलं होतं?” “ नाही. रात्र तशी भाकड गेली,पाणिनी.काहीच घडलं नाही.” तेवढ्यात कनक ला फोन आला. बराच वेळ तो बोलत राहिला. “ नाही, त्यांना काम चालूच ठेवायला सांग.” कनक फोन मधून सूचना देत म्हणाला. “ पाणिनी, ती अंध महिला पुन्हा आपल्या कामावर हजर झाल्ये !” “ का sssय ! ” पाणिनी ओरडला. “ मला अत्ता ओच फोन आला होता,पाणिनी.” “ कुठे हजर झाल्ये कामावर?” “ नेहेमीच्या जागी.ग्लोसी कंपनीच्या आवारात.” “ दोघींपैकी जाण्या सारखी