आरोपी - प्रकरण १०

  • 7.5k
  • 1
  • 4.2k

प्रकरण १० तारकर क्षिती ला घेऊन गेल्यावर काही वेळेतच पाणिनी चा फोन वाजला.अलीकडून कनक ओजस बोलत होता “ पाणिनी, आपण दोघांनी ग्लोसी कंपनीच्या बाहेरच्या वाहनांचे नंबर लिहून घेतले होते , त्या सर्वांचे मालक कोण ते मला समजलंय.त्यातला एक मालक चंद्रवदन विखारे आहे.त्याचा पत्ता आणि फोन माझ्याकडे आहे.बोलायचं आहे तुला?”-कनक “अत्ता नाही. नंतर. माझ्या अशीलावर, क्षिती वर खुनी हल्ला केल्याचा आरोप झालाय आणि तिला अटक झाल्ये.आपण आधी त्या फुगीर पायाच्या अंध बाईला भेटू.बघू तिला म्हणायचंय ते.तू तातडीने तयार रहा. पुढच्या तीन मिनिटात तुझ्या ऑफिस ला येतो मी.” “ ठीक आहे.”-कनक “ या तीन मिनिटात तू तुझ्या माणसांना निरोप दे की शेफाली