भाग 31 युध्दाची चाहूल.. ....... मी काय सांगतो ते निट ऐका! युवराज सुरजसेन म्हणाले.त्यांच्या बाजुला महाराज,रघुबाबा, कोंडूबा उभे होते. आणी त्या सर्वांन मधोमध एक मोठा चौकोनी टेबल ठेवलेला दिसत होता..ज्यावर राहाजगडचा नक्शा होता. आणि आजूबाजूला भिंतिवर तलवारी, भाले ,वाघाचे ,हरणीचे,सिंहाचे डोके लावलेले होते. कोंडूबा! किती सैनिक आहेत आपल्याकडे ? जी युवराज बाराशे सैनिक आहेत! आणि आता वापरत किती आहोत? दोनशे सैनिक! राहाजगडच्या चारही दिशेंना! पन्नास -पन्नास ,असे मिळुन ठेवले हाईत ! म्हंणजे हजार सैनिक आहेत तर! युवराज काहीतरी विचार करत असल्यासारखे डावीकडून उजवीकडे डोळे फिरवू लागले. एक काम करा ? हजार मधले पाचशे सैनिक