रक्त पिशाच्छ - भाग 27

  • 5.2k
  • 2.3k

भाग 27 संध्याकाळी 7 वाजता: रामु सावकाराचा दुमजली वाडा आणि त्याभोवती चौकोनी आकाराने विळखा घातलेला चुन्या-मातीपासुन बनवलेला कठडा दिसत आहे.कंपाऊडला असलेल्या लाकडी दोन झापांच्या गेटमधुन आत अंगणात सर्वकाही सामसुमलेल दिसत होत, रातकिड्यांची किरकिर काय ती थोडीफार कानावर येत आहे! अंगणात बजुलाच एक गोल पाचफुट कठड्याची काळ्या दगडांची विहिर दिसत आहे! त्या विहीरीवर एका टोपशीवर थाली ठेवावी त्याप्रकारे एक गोल लाकडाच विशिष्ट पद्धतीच दार बसवल होत...आणि तो दार लावलेला दिसत आहे ! त्या विहीरीच्या लाकडी दाराला एक छोठासा छेद पडलेला आहे आणि त्या छेदातुन विहीरीच्या गर्भात दडलेला-अंधार दिसत होता.त्या अंधारात निट लक्ष देऊन व शांतपणे कान देऊन ऐकुन पाहता-कसलीतरी