रक्त पिशाच्छ - भाग 25

  • 5.3k
  • 2.4k

भाग 25राझगड महाल तस म्हंणायला दोन मजली होत. पहिल्या मजल्यावर भलामोठ्ठा हॉल, त्यात खाली शाही फरशी ,शाही स्वयंपाक घर, आजुबाजुला सोफे-लाकडी खुर्च्या,टेबल-आणि त्यांवर काचेच्या फुलदाण्या होत्या. हॉलच्या डाव्या-उजव्या बाजुला दोन्ही तर्फे A आकाराच्या कोरिडॉर होत्या.त्या कोरिडॉर मधल्या सर्व खोल्या बंदच होत्या. हा तस म्हंणायला महालात काम-करणारे नोकर चाकर काही खोल्यांच्यात राहत होते.हॉलमध्ये एक जिना होता जो दुस-या मजल्यावर घेऊन जायचा ! जिना चढतावेळेस हॉलमध्ये मधोमध लावलेला मोठा काचेचा झुंबर दिसायचा. पहिल्या मजल्या प्रमाणेच दुस-या मजल्याची रचना ही सारखीच होती. परंतु खालच्या मजल्यावर नोकर राहायचे आणि वर राझघराण्यातली माणस! महाराज-महाराणी, युवराज,युवराज्ञी.जर महालात कोणि अतिथी आलेच तर त्यांच्या ही राहण्याची