रक्त पिशाच्छ - भाग 24

  • 5.5k
  • 2.4k

भाग 24 रात्र सरुन सकाळ उजाडली! डोंगरमाथ्यावरुन सूर्य हलकेच झाकुन पृथ्वीच्या दिशेने पाहू लागला. हिरव्या झाडांमधुन रान पाखर किलबिलाट करु लागली.चिमण्या-चिवचिव करत ओरडु लागल्या.रामुसावकाराच्या वाड्यात अंगणात असलेल्या झोपाळ्यावर तो खुद्द बसला होता. दोन्ही हात झोपाळ्यावर ठेवुन पुढे मागे झुलत होता.लाल कवडी सारखे डोळे खाली जमिनीवर स्थिरावले होते.- काळ रात्री जे काही विलक्षण प्रकार घडल होत-त्याचा लवलेशही त्या डोळ्यांत दिसत नव्हता.वाड्याच्या चौकटीमधुन ढमाबाई एका बदकासारख्या चालेसहीत डुलत-डुलत चालत बाहेर आल्या.तिच्या अवाढव्य शरीरयष्टीमुळे तिच्या मागून येणारा संत्या मात्र कोणालाही दिसत नव्हता. काय ओ ! ढमाबाईंनी झोपाळ्यावर बसलेल्या आपल्या नव-याकडे पाहिल. कधी आला तुम्ही !? व्हई की दाजी!