रक्त पिशाच्छ - भाग 21

  • 5.2k
  • 2.4k

भाग 21 एकंदरीत राहाजगडची वै-याची रात्र सरली होती. त्या एका रात्रीत न जाणे काय-काय विलक्षण घटणा घडल्या होत्या. ज्या घटणांपासुन पुर्णत राहाजगडची प्रजा ..अजाण होती. फक्त ज्यांनी तो अनुभव-स्व्त:समवेत अनुभवला.. त्यातले काही मोजकेच वाचले होते.. तर काही त्या वाईट अघोरी,हिंस्त्र,पाश्वि शक्तिच्या कचाट्यात सापडुन त्याचे भक्ष्य गुलाम झाले होते .आणि त्या वाचलेल्या माणच्या मनातल्या भीतीच्या पटलावर त्या अघोरी,हिंस्त्र शक्तिंचा नंगानाच असा काही उमटलेला.. की ते सर्व उभ्या आयुष्यात ही ते दृष्य विसरु शकत नव्हते ..त्यातलीच एक मेघा होती. नाही का? आपण सर्वांनी पाहिल होतच की त्या बत्तीचा स्फोट कसा झाला, व त्या स्फोटातल्या आगीने कशाप्रकारे त्या भुश्या,चिंत्या,रुश्या तिघांच्या प्रेतांना