रक्त पिशाच्छ - भाग 19

  • 5.3k
  • 2.3k

भाग 19 फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) भाग 19 सूर्य अस्ताला जाताच रात्र झाली, सुर्याची जागा आता चंद्राने घेतली . समंद भुतळावर निलसर प्रकाश पसरला रातकिड्यांची किरकिर वाजू लागली. झपझप करत राहाजगड गावात मातीपासुन बनलेल्या घरांच्या भिंतीवर एकापाठोपाठ मशाली तर कुठे, कंदील , चिमण्या अडकवल्या जाऊ लागल्या.लोक जेवन खावन करुन लवकरच झोपली. मानवाचा कोठेही मागमूसदेखील दिसत नव्हता ज्याने राहाजगडच्या गल्ल्या ओस पडल्या जात त्यात अंधार मिरवू लागला. भटकी कुत्री त्या अंधारात पोटात पाय खोपून मरणाच्या भीतीने कुईकुई करत डोळे मिटुन पडली होती, आणि जर कोठे जरासाही आवाज झालाच तर त्या बिचा-या मुक प्राण्याचे कान आजुबाजुचा