ती काळरात्र - भाग 2

  • 7.5k
  • 2.5k

ती काळरात्र - भाग २शब्दांकन : तुषार खांबल अतिशय कमी वयातच रुपेशने स्वतःच्या हिंमतीवर अमाप प्रसिद्धी आणि पैसा कमावला. रेवती देखील तिच्या या आयुष्यात आनंदी होती. बंगले, गाड्या, नोकर सर्व काही होत. थोडक्यात काय तर सुख पायाशी लोळण घेत होत. दोघांनाही दुःख फक्त एकाच गोष्टीच होत ते म्हणजे संतती. लग्नाला बारा वर्षे उलटून गेली होती. पण घरात अजून काही पाळणा हलला नव्हता. पैश्याने श्रीमंत होते म्हणून लोक समोरून बोलत नसत. परंतु पाठीमागे सर्वांची कुजबुज चालत असे. सर्व तपासण्या करून झाल्या होत्या. सर्व इलाज करून झाले. देव-नवस पण झाले. परंतु पदरी मात्र निराशा. या निराशेमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी दोघांनीही स्वतःला कामात