ती काळरात्र - भाग 1

  • 10k
  • 3.8k

ती काळरात्र - भाग १शब्दांकन : तुषार खांबल सदर कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाकरिता लिहिलेली आहे. यातून समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे कोणतेही उद्दिष्ट नाही. तसेच नावात साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. "आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस.... सर्वपित्री अमावस्या..... म्हणतात कि या पंधरा दिवसात स्वर्गाची दारे खुली असतात आणि या कालावधीमध्ये ज्या कोणाचा मृत्यू होईल त्याला सरळ स्वर्ग प्राप्ती होते." रुपेश आपल्या पत्नीला म्हणजेच रेवतीला सांगत होता. रेवती - माहित आहे मला हे सर्व. लवकर उठ आता. तो देव्हारा पुसून घ्या. पूजा करून घ्या. मी जेवणाची तयारी करून घेते. आज आपल्याला पण वाडी दाखवायची आहे. आणि आज काय करायचे आहे ते