गुंतागुंत भाग १

  • 11.8k
  • 5.4k

गुंतागुंत  भाग  १   नारायण रघुनाथ मोकाशी. पुण्यातल्या एका सहकारी बँकेत ऑफिसर. नेहमी प्रमाणे सकाळची धावपळ सुरू होती. बँकेत वेळेवर जायची घाई होती. अशातच डबा भरता, भरता करुणाला, म्हणजे नारायणच्या  बायकोला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. छातीची धडधड खूप वाढून गेली. शरीराला घाम सुटला होता. तशातच तिने  कसाबसा डबा भरून नारायणला दिला. नारायणने तिच्याकडे पाहीलं आणि त्याला धक्काच बसला. “अग काय होतयं तुला ? चेहरा कसा विचित्र झालाय. घाम पण खूप आलाय. तू ताबडतोब आडवी पड.” तिला झोपवल्यावर त्यांनी बँकेत फोन केला, वरिष्ठांना परिस्थिती सांगून आज येत नाही अस म्हणाला. मग त्यांच्या नेहमीच्या रिक्षावाल्याला फोन करून बोलावून घेतलं आणि दवाखान्यात पोचले.