आरोपी - प्रकरण ८

  • 9k
  • 5k

प्रकरण ८ ग्लोसी कंपनीच्या परिसरात गाडी लावल्यावर दोधे जण लॉबी मधे आले.तिथे साधारण तिशीतली एक तरतरीत अशी मुलगी रिसेप्शन काउंटर ला होती.तिच्या मागील बाजूला टेलिफोन ऑपरेटर मुलगी आपल्या कामात व्यग्र असलेली दिसत होती. कनक तिच्याकडे गेला आणि हसत म्हणाला, “माझ्या मित्राला घेऊन परत आलोय मी.” “ अजून तुम्हाला त्या पेन्सिली विकणाऱ्या अंध बाई मधे रस आहे?” ती रिसेप्शनिस्ट म्हणाली. “ तुम्ही पोलीस आहात की काय? तिला अटक करायला आलाय, भीक मागते वगैरे कारणास्तव?” “ आम्हाला फक्त उत्सुकता आहे.म्हणून आलोय.” पाणिनी म्हणाला. “ ते ठीक आहे पण तुम्ही पोलीस वाटत नाही, तुमच्या सारखे साहेबी घराण्यातले ,फक्त उत्सुकते पोटी इथे येतील हे....अरे