अभयारण्याची सहल भाग ४ भाग ३ वरुन पुढे वाचा.... BP, पल्स, मोजून झाल्यावर मेट्रन, आराम करो असं सांगून चालली गेली. आता खोलीत फक्त संदीप आणि शलाका. “खूप कोरड पडली आहे जरा पाणी देता का?” – संदीप “हो देते ना. अरे बापरे थांबा, विचारून येते.” – शलाका “कोणाला?” – संदीप “मेट्रन ला.” आणि असं म्हणून ती पळाली. पांच मिनिटांनी वापस आली. म्हणाली, “चालेल म्हणताहेत. चहा, दूध सुद्धा द्यायला हरकत नाही असं मेट्रन म्हणाली.” मग शलाका ने त्याला चमच्याने थोडं पाणी पाजलं. “अहो असं चमच्याने का देता आहात ? भांडं द्या नं.” संदीप कुरकुरला. “अहो तुम्हाला उठता येणार नाही.