आपलं माणूस जपलं पाहिजे

  • 12.5k
  • 1
  • 4.3k

सुट्टीचा दिवस असल्याने अभय आज जरा निवांतच होता. आजपासून त्याला चार दिवस सुट्टी होती. सकाळचे नऊ वाजले होते. त्याची नुकतीच अंघोळ झाली होती. आरशात पाहून तो केस विंचरत होता. तितक्यात त्याची पत्नी माया त्याच्यासाठी चहा घेवून आली.           चहाचा कप त्याच्या हातात देवून त्याच्या मुडचा अंदाज घेत ती हळूच म्हणाली,           “तुम्हाला चार दिवस सुट्टयाच आहेत तर आपण कोठेतरी फिरायला जाऊयात.”           “हो जाऊया ना.” अभयही उत्साहानेच म्हणाला.           तेवढयात मायाच्या मोबाईलवर कोणाचातरी फोन आला. मोबाईल स्वयंपाक घरात असल्याने माया आतमध्ये गेली. थोडयावेळाने ती बाहेर आली.           “कोणाचा फोन होता गं.” अभयने सहजच विचारलं.