मुकी :14 बदली झाली आणि आम्ही औरंगाबादला रहायला आलो. आपलच गाव होतं. पण परत नवीन शेजार पाजार, शाळा, कामवाली बाई सगळच नवीन. सामानाच्या बॉक्सनी घर भरून गेलं होतं. स्वैपाकघरातलं सामान आधी लागतं म्हणून ते बॉक्स उघडायच्या तयारीत असताना बेल वाजली. आता आपल्याकडे कोण येणार अशा प्रश्नार्थक मुद्रेने काम आवरत राहिले. कुणीतरी