हिरवे नाते - 12 - काळी माय

  • 6.9k
  • 2.8k

                                                                                     काळी माय : 13  मिल मधली नोकरी सुटली आणि शंकरला बायको मुलाला घेऊन गावी यावं लागलं. गावी वाटण्या झाल्या होत्या. आपापले हिस्से घेऊन तिघेही भाऊ जमिन कसत आणि इतर जोडधंदेही करत  होते. आई वडील वडिलोपार्जित घरात त्यांचे हातपाय हालतात तोपर्यंत तिथेच रहाणार होते. त्यांच्या पश्चात घराच्या वाटण्या होणार होत्या. शंकरने आपले बस्तान चांगलं बसलय म्हणून तिघा भावाना मोठेपणाने