अभयारण्याची सहल - भाग ३

  • 7.2k
  • 3.8k

अभयारण्याची सहल  भाग ३ भाग २  वरुन पुढे वाचा.... संदीप ज्या झुडपात पडला होता ते निवडुंगाचं बेट होतं आणि त्याच्या शरीरात काटे  घुसले होते. चेहऱ्यावर सुद्धा काटे रूतले होते. पंज्याच्या फटकार्‍याने संदीपचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता, पण संदीपला त्या वेळी काहीच जाणवलं नाही आणि ती वेळ काट्यांची पर्वा  करत बसण्याची नव्हती. त्यानी आता खाली पडलेली काठी उचलली आणि पुन्हा एक उरल्या सुरल्या शक्तिनिशी जबरदस्त प्रहार वाघाच्या जबड्या वर केला. वाघ मागे सरकला पण जाता जाता त्याने पंजा मारलाच. संदीप च्या चेहऱ्या वरून आता रक्ताच्या धारा वाहत होत्या. डोळ्यात, नाकात  रक्त गेलं होतं त्यामुळे त्याला काही दिसेना. हातानेच त्याने चेहऱ्यावरचे रक्त