आरोपी - प्रकरण ७

  • 9.3k
  • 5.5k

प्रकरण ७ दुसऱ्या दिवशी दुपारच्या आधी थोडा वेळ कनक ओजस ने पाणिनी च्या ऑफिस च्या दारावर विशिष्ट प्रकारे टकटक केली.सौम्या ने दार उघडून त्याला आत घेतले. “ मला दोन-तीन गोष्टी सांगायच्या होत्या, म्हंटलं स्वतःच जाऊन सांगाव्यात.”-कनक “ बोल ना.काय आहे?”पाणिनी नं विचारलं “ पाहिली गोष्ट म्हणजे, मधुरा खरं बोलते आहे. तिने खरंच जनसत्ता बँकेतून तिच्या खात्यातून सहा हजार रुपये काढले आहेत.ती त्या खात्यात अधून मधून थोडे थोडे पैसे भरत असते.पैसे काढताना तिने करकरीत पाचशे आणि दोन हजार च्या नोटांची मागणी केली होती असं कळलंय.” पाणिनी च्या कपाळावर आठ्या पडल्या. “ पाणिनी याचा अर्थ चोरीचा कांगावा करायचा असा तिचा आधी पासूनच