ग...गणवेशाचा - भाग १

  • 7.9k
  • 3.9k

कथा... ग…गणवेशाचा. शहराच्या थोड्या बाहेरच्या अंगाला ठिगळ लावल्यासारखी वसलेली ती झोपडपट्टी. अस्वच्छता आहेच त्याचबरोबर या झोपडपट्टीला मिळणारं पाणी सुद्धा तसंच अस्वच्छ आहे. तरीही ही झोपडपट्टी त्या घाणेरड्या पाण्यावर पोसुन टणकपणे ताठ उभी आहे. शहरातील इमारतींसारखी ती नाजूक नाही. आजार तर तिच्या पाचवीला पुजलेले होते. औषधं तिनं कधी बघीतली का?अशी शंका येण्याइतपत या झोपडपट्टीची प्रकृती दिसायची. खायला कधी मिळेल कधी नाही. खायला मिळालं तर तेही शिळपाकं असायचं ज्यात जीवनसत्व नावाची गोष्टं नसायची तरीही ती झोपडपट्टी ताठ उभी आहे. अरूंद खोलीत अनेक जण राहतात ऑक्सीजन मिळतो तोही बेताचाच तरीही ती झोपडपट्टी ताठ उभी आहे कारण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना जगवते. शिक्षण म्हणजे