हरि - पाठ ३

  • 5.7k
  • 2.2k

हरि पाठ ३ १० हाचि नेम सारीं साधेल तो हरी । नाम हें मुरारी अच्युताचें ॥१॥ राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे । यादव मोहरे रामनाम ॥२॥न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचे ॥३॥ नाम म्हणे राम आम्हां हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां ॥४॥ ११ करूं हें कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें ॥१॥ जगाचा जनक रामकृष्ण एक । न करितां विवेक स्मरें राम ॥२॥ तुटेल भवजाळ कां करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥३॥ नामा म्हणे गोविंद स्मरें तूं सावध । नव्हे तुज बाधा नाना विघ्नें ॥४॥ १२ मायेचीं भूचरे रज