डॉक्टर असाही असतो. !

  • 10.2k
  • 3.6k

डॉक्टर असाही असतो !   दिनांक १६.०१.१९८०  शहर  नागपूर. गंगाधरराव, स्टेट बँकेच्या किंग्सवे शाखे मधे कार्यरत होते. त्या दिवशी नेहमी प्रमाणे काम संपवून ते घरी जायला निघाले. बँकेच्या समोरच बस स्टॉप होता. त्या बसने ते  नेहमी प्रमाणे सीताबर्डी ला आले. सिताबर्डी हून त्यांनी लक्ष्मी नगर ची बस घेतली. बसला त्या दिवशी खूप गर्दी होती त्यामुळे त्यांना बसायला जागा मिळाली नाही. बस शंकर नगर चौकात आल्यावर बरेच लोकं उतरले आणि बसायला जागा झाली. रिकाम्या जागेवर जाण्यासाठी त्यांनी पाऊल उचललं, आणि काय झालं ते त्यांनाच कळलं नाही. त्यांच्या पायातली शक्तीच गेल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी उजव्या हाताने वरचा दांडा घट्ट पकडला होता,