आरोपी - प्रकरण ६

  • 10.1k
  • 1
  • 5.7k

आरोपी प्रकरण ६ साहिर सामंत ने दाराची बेल वाजल्याचा आवाज ऐकला. दार उघडलं तर दारात पाणिनी आणि सौम्या उभे असलेले पाहून तो चकितच झाला. “ तुम्ही पुन्हा इथे?” “ मला वैयक्तिक, मधुर महाजन यांना भेटायचं आहे.” पाणिनी म्हणाला. “ त्या आता कोणालाही भेटू शकत नाहीत.”-साहिर “ तुम्ही तिच्या वतीने बोलताय का? म्हणजे तिचे वकील किंवा प्रतिनिधी म्हणून काम करताय का?” पाणिनी नं विचारलं “ ती कोणालाही भेटणार नाही.”-साहिर “ म्हणजे तिने तुम्हाला सांगितलं नाहीये तर, की ती कोणालाही भेटणार नाहीये म्हणून !” पाणिनी म्हणाला. “ अर्थात मला तिनेच सांगितलंय.” “ याचा अर्थ तुम्ही तिच्या संपर्कात आहात ?” पाणिनी नं विचारलं