बावरा मन - 16 - Lucky You.....

  • 9k
  • 4.2k

निंबाळकर घरी पोहचतात... त्यांच्या मागे पुरोहित फॅमिली देखील येते... " काय झालं.. सगळ्यांना अचानक का बोलावल आहे..." यशवंत " आम्हांला पण माहित नाही... आम्हांला वंशचा कॉल आला कि इथे या..." मनीष " तुम्ही बसा ना... रुचिका पाणी आण..." रोहिणी रुचिका आणि सिया चहा पाणी बघायला जातात... नक्की काय झालय कोणाला काही कळत नव्हतं... त्यामुळे सगळेच अस्वस्थ होते... " विराज अरे एकदा त्यांना कॉल करून बघ ना..." समीर " हो काका..." विराज मोबाइल काढतो... तितक्यात वंशची एन्ट्री होते... " राहू देत... आले वंश..." राजमाता विराजला थांबवतात... " बसा... सिया पाणी..." मंजिरी सियाला बोलतात... सिया त्याला पाणी देते... " काय झालं वंश...