श्री संत एकनाथ महाराज - २५

  • 4.7k
  • 1.4k

“श्री संत एकनाथ महाराज” 26 एकनाथी भागवत - श्लोक २९ वा सात्त्विकं सुखमात्मोत्थं विषयोत्थं तु राजसम् । तामसं मोहदैन्योत्थं निर्गुणं मदपाश्रयम् ॥२९॥ सांडूनि विषयसुखाची स्फूर्तीं । आत्मसुखें सुखावे चित्तवृत्ती । ऐशिया निजसुखाची प्राप्ती । तें सुख निश्चितीं सात्विक ॥८१॥ गंगापूर भरे उन्नतीं । तेणें अमर्याद वोत भरती । तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ती स्वानंदें ॥८२॥ नाना विषयांचें कोड । इंद्रियांचा अतिधुमाड । विषयसुख लागे गोड । तें सुख सुदृढ राजस ॥८३॥ अतिनिंद्य आणि उन्मादी । तेंचि सुख आवडे बुद्धी । तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥८४॥ हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती । त्यावरी