आरोपी - प्रकरण ४

  • 11.7k
  • 6.3k

प्रकरण चार कनक ओजस ची विशिष्ट प्रकारे दारावर केलेली टकटक पाणिनीने ऐकली त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. सौम्या ने दरवाजा उघडला आणि कनक आत आला. “ हाय कनक ,आता मी सगळं आवरून निघायच्या तयारीत होतो.” पाणिनी म्हणाला. “मला अंदाज होताच तो की तू आज लवकर ऑफिस बंद करून तुझ्या या चिकण्या सेक्रेटरी ला घेऊन कुठेतरी कॉफी हाउस मध्ये जाऊन बसणार असशील. माझ्या वाट्याला तुझ्या खर्चाने खादाडी करायचं भाग्य कधी लागणार आहे कोण जाणे.” “बर बोल, काय विशेष ?” पाणिनी न विचारलं “काही नाही, असे काही प्रसंग घडलेत की त्यामुळे मलाच कोड्यात पडल्यासारखं झालंय.” “काय घडलय विशेष?”- पाणिनी न विचारलं