तीन रूपक कथा

  • 15.8k
  • 2
  • 4.3k

तीन रूपक कथा १) लयती हिवाळ्यातील पहाट होती. सूर्य आपल्या सोनेरी किरणांनी चराचराला स्पर्श करत होता.दंवात हिरवी पाती चिंब भिजून गेली होती.मंद हवेच्या लहरींवर रानफुलांचा धुंद करणारा मंद मंद सुवास सगळीकडे दरवळत होता.सारी सृष्टी हसत होती.पक्ष्यांची किलबिल वातावरणात संगीत जागवत होती.निसर्ग सहस्र हातांनी सौंदर्याची उधळण करत होता. अश्यावेळी एका हिरव्यागार अळवाच्या पानावरील दवबिंदू स्वत:शीच खुदूखुदू हसत होता.सोनेरी किरण त्या दवबिंदूवर पडल्यामुळे तो विलक्षण सुदंर दिसत होता. कुणालाही मोह पडावा अस देखण रूप होत त्याच !वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळ्या रंगाच्या छटा त्यातून बाहेर पडल्याच्या भास होत होता. सम्राटाच्या मस्तकावरील मुकूटामधला हिरा ही लाजावा अेवडा तेजस्वी होता तो दवबिंदू ! आपल्या विलक्षण सुदंर